हॉटेल चालकाचे प्रसंगावधान   

बुलडाण्याच्या पाच जणांचा वाचला जीव 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यादरम्यान हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे बुलडाण्यातील पाच पर्यटकांचे प्राण वाचले. मंगळवारी पहलगाममध्ये गोळीबार झाला तेव्हा बुलडाण्यातील पाच जण एका हॉटेलमध्ये होते. ते हॉटेलमधून पर्यटनासाठी बाहेर पडत असताना हॉटेल मालकाने त्यांना अडवले. गोळीबार सुरू आहे, फिरायला बाहेर पडू नका, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या पाच जणांचा जीव वाचला. 
 
बुलडाण्यातील अरुण जैन हे आपल्या कुटुंबीयांसह १८ तारखेला जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. गोळीबार झाला तेव्हा ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, श्वेता नीलेश जैन, अनुष्का नीलेश जैन हे पाच जण सध्या काश्मीरमध्ये अडकले असून, ते एका हॉटेलमध्ये आश्रय घेत आहेत. हे कुटुंब सुखरूप असल्याचे सांगण्यात येते. 
 

Related Articles